Posts

प्राचीन काळात स्मगलिंग होते कि नाही हे सांगता येणे कठीण पण साधारण १५०१ नंतर निदान पोर्तुगीजांच्या नजरेतून स्मगलिंगला सुरवात झाली समुद्रावर स्वतःचे राज्य आहे अशा भ्रमात असणारे पोर्तुगीज अनेक ठिकाणी फॅक्टऱ्या टाकून बसले त्याकाळात फॅक्टर ह्या शब्दाचा अर्थच मुळी फॅक्टरीचे व्यवस्थापन करणारा असा होता पेपर म्हणजे काळी मीरं आणि मीरेची पूड ही त्याकाळी खास डिमांडमध्ये होती ह्याशिवाय इतर मसाल्याचे पदार्थ होतेच साधारण ६०००० क्विंटल उत्पादनापैकी फक्त १५००० क्विंटल अधिकृत कायदेशीर होते आणि तब्बल ४५००० क्विंटल उत्पादन स्मगल केले जाई म्हणजे स्मगलिंगचे प्रमाण तब्बल ७५% होते त्यामानाने आत्ताचे दिवस बरे आहेत श्रीधर तिळवे नाईक (शैव पॅराडाइम्स अँड यूरोअमेरिकन पॅराडाइम्स ह्या ग्रंथामधून )